महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दोन म्हशी दगावल्या
निलंगा:(
तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील मौजे ननंद येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दोन म्हशी दगावल्या आहेत महावितरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारवार सांगुन सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे झुकलेली तार म्हशीच्या शिंगात अडकून दोन म्हशी दगावल्या नणंद येथील शेतकरी शेषगिरी शंकरगिर गिरी वय 65 वर्षे हे दोन म्हशी व एक वागार दुपारीच्या सुमारास चारत असताना झुकलेली तार म्हशीच्या शिंगात अडकल्यामुळे दोन म्हशी व एक वागार जाग्यातच दगावल्या.
शेषगिरी शंकरगिर गिरी यांना सुद्धा विजेचा झटका लागल्यामुळे बेशुद्ध पडल्यामुळे त्याना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृतीसुद्धा गंभीर आहे. जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे. महावितरनने झालेले नुकसानभरपाई ताबडतोब द्यावी अन्यथा शिवसेना युवासेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यानी दिला आहे.
0 Comments