जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लांबोटा येथील वनउद्यानात वृक्षारोपण
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सार्वजनिक वन विभाग, निलंगा यांच्या वतीने लांबोटा येथील वनउद्यानात येथे वृक्षारोपण करण्यात आले. वनाधिकारी स्व.बापूरावजी कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हे वनउद्यान फुलवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तुकारामजी रोडे व त्यांचा मुलगा चंद्रकांतजी रोडे हे २४ तास येथे राहून आपली सेवा बजावत असतात. लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून आणि लोकसहभागातून सर्व ठिकाणच्या स्मशानभूमी या 'हरित स्मशानभूमी' करण्याचा संकल्पही यावेळी घेण्यात आला आहे. याप्रसंगी भाजपचे युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर , तहसीलदार गणेशजी जाधव, गटविकास अधिकारी अमोलजी ताकभते, वन परिमंडळ अधिकारी संतोषजी बन, पंचायत समिती सभापती श्रीमती राधाताई बिराजदार, सुरेश बिराजदार, माजी पं.स.सभापती अजितजी माने, राजाभाऊ पाटील, श्रीमंतजी (नाना)जाधव, संगमेश्वर करंजे, हाडगा उमरगाचे सरपंच परशुरामजी वाघमारे, वनरक्षक व्ही.व्ही.नेकनाळेजी, वनरक्षक ये.एम.माळीजी, वनरक्षक एस.बी.परेशवाडजी, श्रीमती बरडे ताई, सामाजिक वनपरिमंडल अधिकारी व जावेदभाई मुजावर आदी जण उपस्थित होते.

0 Comments