निलंगा नगर परिषदेच्या नगरसेवकांची आढावा बैठक संपन्न
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा नगर परिषदेच्या बैठकीत शहरात लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक वॉर्ड निहाय लसीकरण कसे करता येईल, पावसाळ्यापूर्वी वार्डातील करावयाची विकास कामे, झोन 3 मध्ये ज्या नागरिकांचे पाणी कनेक्शन राहिले असतील, पाईपलाईनचे शेवटच्या टप्प्यातील कामे शिल्लक असतील त्या नागरिकांसाठी नगरसेवकांनी आपापल्या वार्डात जाऊन नळजोडणीचे आवाहन करणे, वृक्षारोपण अशा विविध विषयांवर भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. निलंगा नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी बाबुराव गायकवाड यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत, नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अरविंदजी पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोजजी कोळ्ळे, न.प मुख्याधिकारी मल्लिकार्जुनजी पाटील, नगरसेवक महादेवजी फट्टे, इरफानजी सय्यद, शरदजी पेठकर, तुकारामजी माळी, सौ.सुमनताई हडोळे, शंकरप्पाजी भुरके, किरणजी बाहेती, विष्णुजी ढेरे, मारुतीजी नागदे, शफीकजी भंगारवाले आदींची उपस्थिती होती.

0 Comments