Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा नगर परिषद कर्मचाऱ्याची कार्यालयाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या

निलंगा नगर परिषद कर्मचाऱ्याची कार्यालयाच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या


निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) येथील मयत बाबूराव नामदेव गायकवाड यांनी मागील 8 महिन्याचे मासिक वेतन न मिळाल्यामुळे नगर परिषदच्या कंपाऊंडवॉलच्या अंतर्गत गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे न.प.निलंगा मुख्याधिकारी व कंत्राटदार व स्वच्छता निरीक्षक यांच्या विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (मनुष्यवधाचा) गुन्हा नोंद करुन त्यांना तात्काळ निलंबीत करुन तात्काळ अटक करावी अशी मागणी मयताच्या मुलगा दत्ता बाबुराव गायकवाड यांनी निलंगा पोलीस ठाण्यात अर्ज देऊन केली आहे. दत्ता बाबुराव गायकवाड रा.निलंगा ता.निलंगा जि.लातूर तक्रारी अर्ज दिले आहे त्यात म्हटले आहे की, माझे वडिल मयत बाबुराव गायकवाड हे गेल्या 35 वर्षापासून म्हणजेच साल सन 1992 पासून नगर परिषद निलंगा येथे मस्टर प्रक्रियेनुसार सफाई कामगार म्हणून काम करत होते परंतु मध्यंतरीच्या काळात सदर व्यक्तीची मस्टर प्रक्रीया बंद करुन कंत्राटी पध्दतीने काम चालू ठेवण्यात आले. सन 2020-2021 मध्ये सरासरी 8 ते 9 महिन्याचा पगार नगर परिषद कार्यालयाने नगर पालिकेतील सर्व कंत्राटी पध्दतीवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मासीक वेतने अदा केलेली नाहीत व सर्व कामगारांना वारंवार मानसीक त्रास देत होते. काल दिनांक 08.06.2021 रोजी माझे वडिल मयत बाबुराव नामदेव गायकवाड हे स्वच्छता निरीक्षक व मुख्याधिकारी नगर परिषद निलंगा व कंत्राटदार यांच्याकडे मागील 8 ते 9 महिन्याच्या मासीक वेतनाची मागणी केली असता सदर वर नमुद व्यक्तींनी माझे वडिल मयत बाबुराव यांना असे म्हणाले की ” गांडीवर लाथा घालीन नगर पालिकेच्या बाहेर हो , ” असे उध्दट भाषेत बोलून वाद विवाद करुन त्यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बाहेर हाकलून दिले. त्यामुळे माझे वडिल हे आर्थीकदृष्ट्या कमकुवता झाल्यामुळे व वरील व्यक्तींनी मासीक वेतन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे माझे वडिल मयत बाबुराव यांनी आज दिनांक 09.06.2021 रोजी पहाटे अंदाजे 4.00 वाजता नगर परिषद कार्यालयाच्या कंपाऊंडवालच्या आतील बदामाच्या झाडाला स्वतःला लटकावून गळफास घेतला आहे. त्यामुळे माझे वडिल मयत बाबुराव यांच्यावर खुप अन्याय झालेला आहे. तरी मला न्याय मिळणे आवश्यक आहे. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मयत माझे वडिल बाबुराव नामदेव गायकवाड (सफाई कामगार) रा. निलंगा यांच्या मृत्युचे दोषी मुख्याधीकारी व स्वच्छता निरीक्षक व कंत्राटदार यांना ग्राह्य धरुन त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करुन त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे व मला माझ्या वडिलांच्या जागी न.प. कार्यालयात समायोजन करुन घेण्यात घेऊन माझ्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे सदरील प्रकरणी तपास निलंगा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments