Latest News

6/recent/ticker-posts

सन्मान माझं लातूर परिवाराच्या सेवावृत्तीचा !

सन्मान माझं लातूर परिवाराच्या सेवावृत्तीचा !


माझं लातूरने केलेलं कोरोना काळातील कार्य अविस्मरणीय-महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे गौरवोदगार 

के. वाय. पटवेकर

लातूर: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर "माझं लातूर" या सामाजिक परिवाराने पुढाकार घेऊन अनेक रुग्णांना मदत केली. ''सेवा नव्हे तर कर्तव्य'' या भावनेतून केलेल्या मदतकार्याचा गौरव महापौर विक्रांत गोजमगुंडे, शिवसेना नेते ॲड. बळवंत जाधव, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी उपमहापौर देवीदास काळे, डॉ खलील पठाण  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठान आणि छत्रपती शाहु चौक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी माझं लातूरच्या कार्याचा यथोचित सन्मान करीत आपलं हे कार्य राज्यातील इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि समाजसेवक यांच्यासाठी दिशादर्शक ठरणारे आहे. हे कार्य पुस्तक रुपात जतन करावे असे आवाहन त्यांनी केले. तर माझं लातूर परिवाराचा सदस्य असल्याचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचा उल्लेख शिवसेना नेते बळवंत जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला. माझं लातूर परिवाराने आता लातूरच्या पाणी प्रश्नासाठी लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन केले. या सन्माम सोहळ्यात माझं लातूर परिवाराचे प्रमोद गुडे, अभय मिरजकर, डॉ. सितम सोनवणे, सतीश तांदळे, गोपाळ झंवर, तम्मा पावले, काशीनाथ बळवंते, संजय स्वामी आणि राहुल मातोळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आनंद कलमे, रवी सुडे, अविष्कार गोजमगुंडे, भगवंत कदम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा किशन बडगिरे यांनी तर आभारप्रदर्शन निरंजन रेड्डी यांनी केले.






Post a Comment

0 Comments