Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर शहरातील दोन दुकानांना भिषण आग;आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळुन खाक,एक गंभीर जखमी

चाकुर शहरातील दोन दुकानांना भिषण आग;आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळुन खाक,एक गंभीर जखमी


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) शहरातील  मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने भिषण आग लागल्याने आतील सर्वच साहित्य जळुन खाक  झाल्याची घटना सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली.आगीत दोन्ही दुकानातील सामान आणि फर्निचर जळुन अंदाजे सहवीस  लाख पन्नास  हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.यावेळी एक युवक गंभीररित्या भाजला असुन त्यांच्यावर लातुर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकुरमध्ये मुख्य बाजारपेठेत संभाजी लोंढे यांचे टेलरिंग मटेरीयल होलसेल दुकान आहे.त्यालगत शेख उस्मान शेख यांचे इंटरनेट कॕफे आणि जॉबवर्कचे दुकान आहे.कोरोनामुळे रविवारी शहरात कडक निर्बध लागु होते.संभाजी लोंढे यांचा मुलगा सुरज लोंढे [२५] हा दुकानाच्यावरील घरात झोपी गेला होता.सोमवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास सुरज लघुशंकेसाठी बाहेर आला.तेव्हा दुकानातुन धुर निघत असल्याचे त्याला दिसले.दुकानाचे दार उघडताच आतुन आगीच्या ज्वाला दिसले.यात होरपळुन गेल्याने सुरज लोंढे गंभीर जखमी झाला.त्याने लगेच नातेवाईकांना फोन करुन आगीची माहिती दिली. नातेवाईकांनी लागलीच दुकानाकडे धाव घेतली.त्यानी पहिल्यांदा सुरज याला स्थानिक दवाखान्यात दाखल केले.यानंतर त्याला अधिक उपचारासाठी लातुर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान आगीने रोद्ररुप धारण केल्याने काही वेळातच दुकानातील सर्व साहित्य,फर्निचर भस्मसात झाले.आगीत संभाजी लोंढे यांच्या दुकानातील काचबटनच्या दोन मशीन,फर्निचर,टेलरिंग साहित्य जळुन अंदाजे बावीस  लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.तर या दुकानालगत उस्मान शेख यांचा इंटरनेट कॕफे आणि जॉबवर्क सेटर आहे.आगीत यातील चार संगणक संच, तीन प्रिटर्स,साउंड सिस्टिम, फर्निचर, जळुन अंदाजे चार लाख पन्नास  हजार रुपयांचे नुकसान झाले.सोमवारी सकाळी पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट,पोहेकॉ हणमंत आरदवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Post a Comment

0 Comments