चाकुर काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन
नायब तहसिलदार बालाजी चितळे यांनी निवेदन स्वीकारले
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) केंद्रे शासनाने कच्चाय तेलचे भावा आंतरराष्ट्रीय बाजारात कमी दरात होऊन सुध्दा इंधनवाढ केल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित बघडले आहेत.महागाईने उचाक गाठला आहे. सामान्य जनेतेच्या डोळ्यांत महागाईमुळे अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत.शेतकऱ्यांना इंधनवाढीचा फटका बसला आहे.डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेती करण्यासाठी खर्च वाढला आहे. केंद्रीतील मोदी सरकारने पेट्रोल,डिझेल,व गॕसच्या किमतीत भरमसाठ भाववाढ केली आहे.पेट्रोल १०० च्या पार, डिझेल ९२ रुपये झाले. गॕसच्या किमतीही ८५० रुपये झाल्या आहेत. शंभरी पार कोरोनाच्या महामारी व इंधनवाढीमुळे सर्वाचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. चाकुर शहरांमधील दिनांक ७ वार सोमवार रोजी चाकुर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारने गॅस ,डिझेल, पेट्रोल च्या किमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून करण्यात आले असल्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलासराव पाटील चाकुरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व शहराध्यक्ष पप्पुभाई शेख यांनी केले. कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही, अनेकांचे रोजगार या कालावधीमध्ये गेले आहेत.याचा परिणाम सर्वच जनतेवर पडला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली आहे. गॅस पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत या भाववाढीच्या विरोधात काँग्रेस कमिटी सर्व नियमांचे पालन करून आंदोलन करण्यात आले.यावेळी विलास पाटील चाकुरकर,शेख पप्पुभाई,भागवत फुले,सलीमभाई तांबोळी,सिताराम मोठेराव,गंगाधर केराळे,सुनील दांडगे,बाळु इरवाने,अनिल महालिंगे,सचिन चाकुरकर,सुनील शिंदे,गफुर मासुलदार,रणजीत पाटील शेळगांवकर,तौसिफ शेख,अविनाश गोलावार,शेख अझहर,वाजीद सौदागर,अझहर सौदागर,इम्रान शेख,शकील गुळवे,भारत राठोड,बालाजी मोठेराव,रवि नाईकवाडे,योगेश भोसले,दिनेश फुले,शंकर मोरे,मनोज सोमवंशी,अझर सय्यद,शेख अहमद,उबेद शेख,पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.यावेळी ए.पी.आय.गावडे मॕडम, चाकुर बिटअंमलदार पोहेकॉ हणमंत आरदवाड,हेकॉ तुडमे,तानाजीआदरवाड,दत्ता तोरमोटे,सुकेश केंद्रे,आदीच्या उपस्थित चोख बंदोबस्त लावण्यात आला.
केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल,गॕसवाढ कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस कमेटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी ते म्हणाले केंद्रीतील सरकार शेतकरी विरोधी आहे.पेट्रोल,डिझेल,गॕस वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहे.लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही.त्यातच महागाईने उच्चांक गाठला आहे.सर्वसामान्य माणसांचे आर्थिक घडी बिघडली आहे.शेतकरी,शेतमजुर,व्यापारी,कामगार,रोजगार,सर्वच लोक महागाईमुळे मेटाकुटीला आले आहेत.दरवाढ रद्द करण्यासाठी पक्षाच्या वतीने आंदोलन करुन कुंभरर्णी झोपेचा सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले
विलास पाटील चाकुरकर
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी, चाकुर तालुका अध्यक्ष

0 Comments