सावरगाव उपसरपंचानी विविध सामाजीक उपक्रमातून केला वाढदिवस साजरा
देवणी:( प्रतिनिध/विक्रम गायकवाड ) महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना मध्ये समाविष्ट ग्रामपंचायत मौजे सावरगाव येथील उपसरपंच सौ स्वाती ताई जोळदापके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गावातील आरोग्य उपकेंद्रामध्ये असणाऱ्या जागेत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
तसेच कोविड काळात गावामधे अतिशय चांगली कामगिरी बजावली यामुळे गावातील आशा कार्यकर्त्या उषा ताई स्वामी व लक्ष्मीताई बोबडे यांचा सुद्धा या प्रसंगी सत्कार करन्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयास पिण्याच्या पाण्याचे जार यावेळी भेट म्हणून देण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सत्यभामा ताई मसुरे , उपसरपंच लक्ष्मी ताई जवळदापके , ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्ती, CRP सारिका ताई सावरगावकर, अंगणवाडी सेविका शशिकला बिरादार इत्यादी उपस्थित होते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करून गावापुढे एक नवीन आदर्श यावेळी स्वाती ताईंनी ठेवलेला आहे.


0 Comments