Latest News

6/recent/ticker-posts

आमदार निधीचा वापर फक्त शेतकऱ्यासाठीच करणार- आ.अभिमन्यू पवार

आमदार निधीचा वापर फक्त शेतकऱ्यासाठीच करणार- आ.अभिमन्यू पवार


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) शासनाच्या विविध प्रकारच्या विविध योजना आहेत,मात्र त्या योजना फक्त कागदावरच न राहता त्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे,योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली पाहिजे असे मत औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा मतदार संघातील गावांना शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मनरेगा अंतर्गत गावचा विकास समृद्धीकडे,या अभियानाअंतर्गत गाव तिथे भेट च्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे शेतकऱ्यांशी मार्गदर्शनपर बोलताना म्हणाले.नदीहत्तरगा, कोकळगाव, कामलेवाडी, रामतीर्थ, मदनसुरी,हडोळी, सरवडी, मुदगड एकोजी,आनंदवाडी, हणमंत वाडी,आज इत्यादी गावांना भेटी दिल्या. यावेळी निलंगा येथील कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कासार सिरसी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे,सरपंच गुरलिंग वाकडे,तंटामुक्ती अध्यक्ष लालासाहेब शेख, ग्रामसेवक सत्यवान जाधव, यांची उपस्थिती होती.आमदार पवार म्हणाले, शासनाच्या विविध प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत,शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.फळांच्या झाडांची लागवड करणे,शेततळे करून मासेमारी चे उत्पन्न वाढवता येईल,नदी,नाले,ओढे च्याबाजूने बांबूची लागवड करणे आज काळाची गरज आहे, शेतीसाठी बांबूचे कुंपण म्हणून लागवड करावी,शासनाच्या विविध योजना शासकीय अधिकाऱ्याकडून समजावून घ्या शेतकऱ्यांनी करावी असे आवाहनही यावेळी केले यावेळी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला.

Post a Comment

0 Comments