औसात विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिस व पालिकेने केली कडक कारवाई
शेख बी जी
औसा:दि.१० शहरात लाॅकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. याकडे लक्ष देऊन पोलिस प्रशासनाने व पालिकेतील कर्मचाऱ्यांनी बिना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कडक कार्यवाही करत दंड वसुली केली. व्यापारी वर्गातून सतत मागणी होत असल्याने व शासनाने येल्लो झोन मध्ये आलेल्या जिल्ह्यांना लाॅकडाउन मधून सुटका केली असल्याने नागरिकांची वर्दळ शहरात वाढली आहे. नागरिक बिनधास्त पणे विना मास्क फिरत असताना दिसून आल्याने पालिका व पोलीस प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कार्यवाही केली. यावेळी पालिकेचे कर्मचारी माईक द्वारे माहिती देत आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसल्याचे व तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे सांगत फिरत आहे. मात्र नागरिक गाफील असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घातल्यानंतर आत प्रवेश द्यावा अशा सुचना माईक द्वारे कर्मचारी करत आहेत.
0 Comments