राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापणदिनानिमित्त निलंगा येथे झेंडावंदन
इरफान शेख/सलीम पठाण
निलंगा: निलंगा येते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निलंगा तालुका व शहर च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक खासदार शरदचंद्रजी पवार , राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ,लातुर जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील यांच्या सूचना व पक्षाच्या आदेशानुसार तालुका गाव वार्ड गणा नुसार वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दिनांक 10/06/ 2021 रोजी पक्ष कार्यालय निलंगा येथे ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आरोग्यविषयक मार्गदर्शन covid-19 च्या बाबतीत पक्षाकडून कोरोना बाबत मदत करणे लोकांच्या समस्या सोडवणूक करण्याचे ठरले आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व शरद पवार यांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहचले आहे 22 वर्षात पक्षाच्या भरारीची व कामाचा आढावा यावर चर्चा करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी लक्ष्मण कांबळे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, हसन चाऊस नगरसेवक, उल्हास सूर्यवंशी युवक तालुका अध्यक्ष, महेश चव्हाण तालुका कार्याध्यक्ष युवक, महिला अध्यक्ष पानफूल ताई पाटील, धोडीराम वाघमारे, राजकुमार मोरे, धम्मानंद काळे, प्राध्यापक प्रवीण कवटकर, सिद्दिक मुल्ला, सलीम पठाण, अमर माने, ओम शिंदे, पंकज शिंदे, कुशाबा कांबळे, ऍड निहाल पटेल, शेख नजीर, सुनील सांडवे, समद लालटेकडे, रोहित पाटील, राम डिगोळे, उमेश मसलगे, राम सगर, शिवाजी एकूणडे, अमर पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments