लॉकडाउन काळात "आधार प्रतिष्ठानाचा"आधार
शेख बी जी
लातूर: दि.१० - राज्यात संपूर्णतः लॉक डाऊन परस्थिती निर्माण झाली असताना अनेकांच्या हाताला काम नाही ,रोजगार नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली ,अनेक सामाजिक संस्था ,प्रतिष्ठाने वेगवेगळ्या पद्धतीने मदतीसाठी पुढे आले. असेच एक प्रतिष्ठान ज्याचे नाव "आधार प्रतिष्ठान" आहे.या प्रतिष्ठानाने बंद कालावधीमध्ये ज्यांना रोजगार नाही, ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे, ज्यांना एक वेळेचे जेवन सहज मिळत नाही. अशा घरांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अन्नधान्याचा पुरवठा केला. तसेच कोविड काळामध्ये राज्याला रक्ताची गरज असताना रक्तदान शिबिर घेऊन रक्तसाठा जमवला. मागील दोन महिन्यापासून सतत जनतेच्या संपर्कात राहून कुणाला कशाची गरज आहे याचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत ती मदत पोहचविण्याचे कार्य "आधार प्रतिष्ठानाने" केले आहे. दिनांक 6 व 7 जून 2021 रोजी, आधार प्रतिष्ठान, भादा. यांच्या वतीने इच्छुक दात्याकडून एकत्रित करण्यात आलेले धान्य, तसेच आधार प्रतिष्ठान, भादा यांच्या वतीने घेण्यात आलेले इतर साहित्य, एकत्रित करून एका कुटुंबाचे काही दिवस धान्याची व्यवस्था होईल या हेतूने किट वाटप करण्यात आले. सदरच्या किटमध्ये, पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो कांदा, एक किलो मिठाचा पुडा, हळदीचा पुडा, मिरची पुडा, तेलाचा पुडा, असे किट तयार करून जे खरे गरजू आहेत, ज्यांचे covid-19 च्या प्रादुर्भावामुळे खूप नुकसान झाले आहे, रोजगार नाही, दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था नाही, अशा गरजूंची, विविध भागातील परिचितांकडून, यादी तयार करण्यात आली. आणि अशाच गरजूंना सदरची मदत घरपोच त्यांना देण्यात आली, विशेषतः खेड्या पेक्षा शहरा मध्ये वाढलेली बेरोजगारी, अन्नधान्याचा तुटवडा पाहता, शहरी जनतेला गावातील जनतेकडून आधार या उद्देशाने लातूर शहरातील काही भागात, लातूर शहरालगत असणाऱ्या पाखरसांगवी गावात, औसा शहरातील काही भागात, हळदुर्ग तालुका औसा या गावात व भादा, तालुका औसा या गावात या अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले, किट वाटपाच्या वेळी covid-19 च्या आजाराला रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता आणि लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले विशेष पत्रके, मास्क, वाटप करण्यात आले व याबाबत माहितीही सांगण्यात आली या सर्व कार्यात आधार प्रतिष्ठान सोबत सुर्योदया सायन्स फाउंडेशन, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याकामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी पाटील तसेच राम पाटील, रियाज खोजे, प्रशांत पाटील, शमशुद्दीन खोजे, ज्येष्ठ पत्रकार बालाजी उबाळे तसेच अन्य सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

0 Comments