मयत युवकाच्या परिवाराला महावितरणने आर्थिक मदत करावी यासाठी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) निलंगा तालुक्यातील खडक उमरगा या गावातील काही घरावरून विद्युत महावितरणची विद्युत तारा गेल्या आहेत या विद्युत तारेचा शॉक लागून येथील विकास शिवाजी कदम वय सत्तावीस वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याला सर्वस्व महावितरण कार्यालय जबाबदार आहे असे ग्रामस्थ व कुटुंबीय हे म्हणत आहेत. ग्रामस्थांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयाला लेखी तक्रार करून सुद्धा महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला आहे. तरी महावितरण कार्यालयाने विकास कदम यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन त्यांना सहकार्य करावे यासाठी खडक उमरगा येथील ग्रामस्थाने आज विद्युत महावितरण कार्यालय निलंगा येथे ठिय्या आंदोलन करून अभियंता ढाकणे यांना निवेदन दिले आहेत.
0 Comments