युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खते व बियाणाचे वाटप
निलंगा :(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील मौजे ननंद येथे कृषी विभाग व शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत अशा शेतकऱ्यांना तूर हे बियाणे मंजूर झाले आहेत .कोरोना काळामध्ये कृषी दुकानासमोर गर्दी होऊ नये व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका कृषि कार्यालय निलंगा व युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांच्या वतीने मौजे.नणंद येथे तूर हे बियाणे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी तालुका कृषि कार्यालयाचे राठोड व घारोळे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी आप्पाराव लादे, राजकुमार तांबाळे, कुमार लादे, श्रीधर गिरी, उद्धव जाधव, व्यंकट पाटील, विलास माळी, अभय मिरगाळे, औंढे मामा, एजाज शेख, राम लादे,बसवराज मिरगाळे, वैजनाथ लादे आदी जण उपस्थित होते.

0 Comments