Latest News

6/recent/ticker-posts

समाजसेवेचे वाण आईवडिलांकडूनच मिळाले-विजयकुमार लड्डा

समाजसेवेचे वाण आईवडिलांकडूनच मिळाले-विजयकुमार लड्डा


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) रविवार दि.12 जूनसAaमाज सेवा हीच ईश्वर सेवा असते,या संकल्पतेतून प्रत्येक व्यक्तीचे समाजासाठी निस्वार्थ भावनेने, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ,याच जाणिवेतून समाजसेवेचे वाण माझ्या आईवडिलांकडूनच मिळाली असल्याचे मत कोकळगाव येथील विजयकुमार लड्डा यांनी नागरिकांना अमृत बिंदूचे वाटप करताना मांडले. यावेळी पत्रकार जीवन जाधव,संतोष मेहकरे,लक्ष्मीकांत लड्डा, बापूराव लामतुरे,काशिनाथ आगलावे,यांची उपस्थिती होती. विजयकुमार लड्डा यांनी कोरोना या महामारीच्या काळात फ्रंट वर्कर म्हणून सामाजिक सेवेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मास्कचे,आर्सेनिक गोळ्यांचे मोफत वाटप केले.पाणी टंचाईच्या काळात त्यांनी गावासाठी मोफत बोर मारून दिले.सद्या ते सांगली येथे स्थायिक असल्याने कोरोना काळात त्यांनी साठ बेघर नागरिकांना दोन महिने एकावेळी च्या जेवणाची सोय केली.तसेच पोलीस मित्र,सफाई कामगार, कोविड सेंटर येथेही अमृत बिंदूचे वाटप केले आहे.गावाकडील अनेक वृद्धांच्या डोळ्यांचे ऑपरेशनही केलेले आहे.गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करणे,कुपवाडा येथील आर्मी वेल्फेअर साठी एक लाख रुपयांचा निधी देने,आशा प्रकारचे सामाजिक सेवा जोपासणारे लड्डा यांनी स्वतःच्या घराची वास्तूशांती वृद्धाआश्रमातील गरजूंना कपडे वाटप करून एका अनोख्या पद्धतीने  केली.स्वतः सहित घरातील सदस्यांचा मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केलेले आहे.

Post a Comment

0 Comments