काँग्रेसचे नेते अभयदादा सोळुंके यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी उत्साहात साजरा
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील पानचिंचोली या खेडेगावातून उदयास आलेले नेतृत्व म्हणजे अभय साळुंके. जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारा सामान्य कार्यकर्ता ते आपल्या खुमासदार भाषणाने युवकांच्या मनाला भूरळ घालनारा नेता अशी अचंबीत करणारी वाटचाल अभय साळुंके यांनी अल्प कालावधीत साधली आहे. काँग्रेसचे युवा नेते अभयदादा साळुंके यांनी त्यांच्या आता पर्यंतच्या कारकीर्दीला व एकंदर व्यक्तीमत्वाला अनुसरुन वाढदिवसानिमित्ताने आशा कार्यकर्ती यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे वाढदिसाचे औचित्य साधत कोरोना वॉरिअर्स म्हणुन अग्रभागी राहून काम करणाऱ्या आशा कार्यकर्तींचा सत्कार व सन्मान करुन त्यांच्या कार्याची दखल घेतली. अभय साळुंके यांच्या या उपक्रमाचे व संकल्पाचे पंचक्रोशीत कौतूक होत आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे युवानेते अभय साळुंके यांचा वाढदिवस निलंगा शिरुरअनंतपाळ देवणी तालुक्यातील विविध गावात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवुण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी अभय साळुंके यांनी बाभळगाव येथे जाऊन कै विलासराव देशमुख यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पानचिंचोली येथे ग्राम पंचायत, सोसायटी, तंटामुक्ती समिती, शिवरूद्र प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याठिकाणी औराद बाजार समितीचे संचालक गंगाधर चव्हाण, बसपुरचे सरपंच माधव कांबळे, उपसरपंच राम पाटील यांनीही सत्कार केला. मुगाव येथे अभय साळुंके मित्रमंडळ व उदयगीरी लाईन्स क्लब च्या वतीने आयोजित नेत्र रोग शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्या ठिकाणी योगेश पाटील, हबीब देशमुख, समाधान वाडीकर व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण मुगाव गाव उदयगीरी लायन्स क्लब दत्तक घेणार असल्याचे लायन्स क्लबचे प्रशासकीय अधिकारी एस एस पाटील, शिबीर समन्वयक गणेश मुंडे यांनी अभय साळुंके यांना पत्र दिले. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात वाढदिवसानीमित्त रुग्णांना फळवाटप करण्यात आले .दुपारी बारा वाजता निलंगा येथील शासकीय वसतिगृहात कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आहोरात्र जनतेच्या सेवेत असलेल्या तालुक्यातील ३०० आशा कार्यकर्त्यांना भाऊ म्हणून साडीचोळी भेट देऊन उपविभागीय अधिकारी विकास माने, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या उपस्थितीत सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आपल्या आडचणी अभय साळुंके यांच्यासमोर मांडल्या त्या आडचणी सोडविण्यासाठी तुमचा भाऊ म्हणून मी पाठीशी उभा असल्याचा शब्द त्यांनी आशा कार्यकर्त्यांना दिला. वाढदिवसानिमित्त नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी निलंगा देवणी व व शिरुळ आनंतपाळ तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी जि प सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच चेअरमन कार्यकर्ते साळुंके यांचे चाहते वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले . तदनंतर अभय साळुंके यांनी कै डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याच ठिकाणी निलंगा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, शहराध्यक्ष गोविंद शिंगाडे, प स सदस्य महेश देशमुख, टि टि माने, एस एन शिरमाळे, अजगर अन्सारी, अॅड नारायण सोमवंशी, माधवराव पाटील, गोविंद सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे इस्माईल लदाफ, उल्हास सुर्यवंशी, महेश चव्हाण, शिवसेनेचे दत्ता मोहळकर, भैय्या निंबाळकर, तुराब बागवान, उपसरपंच मदन बिराजदार, सोमनाथ कदम, सिध्देश्वर बिराजदार, गिरीष पात्रे , गोरख नवाडे , पद्मसिंह पाटील , विवेक पांचाळ अदिसह अनेक व्यापारी व वकील मंडळ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments