Latest News

6/recent/ticker-posts

दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांने वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांने वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


लातूर:(जिमाका)दि.16 - माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत क्रीडा आयुक्तांनी सर्व जिल्‍हा क्रीडा अधिकाऱ्यांना सुचीत केलेले आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भामुळे सन 2020-21 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी साठी बाबतीत इयत्ता 8 वी व 9 वी मध्ये शिकत असताना सदर खेळाडूने विविध स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येईल. तसेच 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या (खेळाडू) विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थी इयत्ता 11 वी मध्ये शिकत असताना सदर खेळाडूने विविध स्तरावरील स्पर्धेतील सहभाग विचारात घेवून सन 2020-21 मध्ये क्रीडा गुणांची सवलत देण्यात येणार आहे. तरी लातूर जिल्हयातील पात्र खेळाडू,क्रीडा शिक्षक,मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी नोंद घ्यावी व शिक्षण मंडळाचा क्रीडा सवलत गुणासाठी असलेला जुनाच फॉरमॅट वापरुन परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, लातूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत व सदर प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 21 जून 2021 आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल,औसा रोड,लातूर येथे संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Post a Comment

0 Comments