Latest News

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांची लूट थांबवून योग्य दरात व तात्काळ बी - बियाणे उपलब्ध करा- स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांची लूट थांबवून योग्य दरात व तात्काळ बी - बियाणे उपलब्ध करा- स्वाभिमानी शेतकरी संघटना


उमरगा:( प्रतिनिधी/ वजीर शेख ) आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनातील कामचुकार, नियोजनशून्य ,संवेदनशुन्य, गलथान कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे ऐन पेरणीच्या हंगामात बी-बियाने व खतांच्या क्रत्रीम टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांना चढ्या भावाने खते व बी-बियाने खरेदी करावी लागत आहेत. संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवून शेतकऱ्यांची गैरसोय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून बी-बियाने व खतांची रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावी येत्या चार दिवसांत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पंचायत समिती कार्यालय उमरगा समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी पंचायत समिती, उमरगा यांना देण्यात आला असून या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर सूर्यवंशी, वजीर शेख, करीम शेख, जाकिर मुजावर, राहुल सूर्यवंशी, श्रावण वाकले, जयवंत कुलकर्णी, मेहबूब पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments