Latest News

6/recent/ticker-posts

बोगस बियाणे कंपनीवर कारवाईच्या मागणीसाठी मनसेचा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना घेराव

बोगस बियाणे कंपनीवर कारवाईच्या मागणीसाठी मनसेचा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना घेराव


संबधित बियाणाची विक्री थांबविण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आदेश 

निलंगा:{तालुका प्रतिनिधी/इरफान शेख} बियाणाची गुणवत्ता व प्रकल्पावरील खरेदी केलेली बियाणे व बाजारात उपलब्ध बियाणे याचा ताळमेळ एकमेकांना लागत नसल्याने व बियाणाच्या सर्टीफाईड बाबत कृषी कार्यालयात कागदपत्रे उपलब्ध नसल्याने संबंधित बोगस बियाणे कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी होईपर्यंत संबधित कंपनीच्या बियाणांची विक्री थांबविण्याचे आदेश जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी काढले आहेत. गेल्या वर्षी अनेक कंपण्याचे बियाणे उगवले नाही म्हणून शेतकऱ्यांनी बियाणासाठी सोयाबीन न ठेवता ते विक्री केल्याने यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणाची मागणी वाढली. त्यातच महाबीज बियाणाचा तुटवडा पाहता बाजारात अनेक बियाणे कंपणीने बोगस सिंगल टॅग बियाणे बाजारात आणले त्यातील मांजरा सिड्स व महा तेरणा सिड्स यांचे सोर्स तपासून मुक्तता अहवाल द्यावा व चालू वर्षाचे एक व दोन स्टेटमेंट देण्यात यावे अशी मागणीचेे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये निलंगा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नावावर कमी बॅग प्रात्यक्षिक बियाणे दाखवून जादा बियाणे खरेदी केल्याचे दाखवण्यात आले तर तीन वेळेस एकाच वर्षात सिड्स प्लांट दिल्याची धक्कादायक माहिती नोंदणी अहवालात समोर आली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची नावे अनेक वेळेस अहवालात दिसत आहेत. याचाच अर्थ असा होतो की बियाण्याचे सोर्स हे बनावट कागदोपत्री नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे बोगस बियाणे बाजारात या कंपन्या नी तयार करून कृषी सेवा केंद्राकडे विक्री साठी ठेवण्यात आले आहेत. सोमवार (दि १४) रोजी जिल्हा कृषी अधिकारी निलंगा कृषी कार्यालयात आले असता डॉ नरसिंह भिकाणे व शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सदरील प्रकार पुराव्यानिशी त्यांच्या समोर मांडत मांजरा व महा तेरणा कंपण्याच्या सर्टीफाईड कागदपत्रांची मागणी केली असता ते कृषी कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याने तुम्ही बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत आहात म्हणून संतप्त डॉ भिकाणे, आरपीआयचे जिल्हाउपाध्यक्ष अंकुश ढेरे, राष्ट्रवादीचे महेश सुर्यवंशी अदीनी जिल्हा कृषी अधिकारी गवसाने यांना संबधित कंपणीवर कारवाई करण्यासाठी घेराव घातला. थोडा वेळ कृषी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित कंपणीची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आली. अखेर जिल्हा कृषी अधिकारी गवसाने यांनी संबंधित बियाणाची चौकशी होईपर्यंत विक्री थांबविण्याचे तात्काळ आदेश देत ज्या शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले आहे. त्यांनी चौकशी होईपर्यंत पेरणी करु नये चौकशीअंती दोषी निघाल्यावर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस बियाणे कंपण्या जबाबदार राहतील असे प्रसारमाध्यमांच्या समोर जिल्हा कृषी अधिकारी गवसाने यांनी सांगितले. 

कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवू-डॉ. भिकाणे 

बाजारातील सोयाबीन बियाणाचा तुटवडा पाहता अनेक कंपन्यांनी बोगस बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू केली आहे. बोगस बियाणे बनवलेल्या दोन कंपण्याची पुराव्यानिशी माहिती कृषी विभागाला सादर केली आहे. जिल्हा कृषी अधिकारी यांनी चौकशी त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी होईपर्यंत संबंधित महातेरना व मांजरा सिड्स बियाणे विक्री बंद केली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो परंतु शेतकऱ्यांची लूट मनसे खपवून घेणार नाही. जो पर्यंत संबंधित कंपण्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments