शिवरायांच्या चरणी शिवकालीन नाणी चलन समर्पित करून बेवनाळे सरांनी साजरा केला शिवराज्याभिषेक दिन
केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) निलंगा येथील बेवनाळे सौदागर यांनी आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा केला आहे. राज्याभिषेक प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी छापलेली आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे श्री राजा शिव छत्रपती हे नाव धारण करून सोन्याचा "होन " व तांब्याचा पैसा "शिवराई "च्या स्वरूपात आलेले स्वराज्याच्या जनसामान्य बहूजन लोकांचे चलन म्हणजे "शिवराई " हे चलन देवाण घेवाण करण्यासाठी वापरत. या दोन्ही नाण्यांवर एका बाजूला बिंदूमय वर्तुळात तीन ओळीत श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला दोन ओळीत छत्रपति असे छापलेले आढळते. तांब्याच्या शिवराई पैशाचे वजन साधारणतः ९ ते १२ ग्रॅम आणि व्यास २.५ग्रॅम इतका असतो, सोन्याच्या होनचे वजन २.७२८ग्रॅम असून त्याचा व्यास १.३ सेमी इतके असते. या दोन नाण्यांनी मराठेशाहीच्या नाण्यांची मुहूर्तमेढ रोवली असेच म्हणावे लागेल. १६ व्या शतकापासून ते १९ व्या शतकापर्यंत ही नाणी चलनात असावी हा किती मोठा क्रांतिकारी निर्णय त्या वेळी महाराजांनी घेतला, याच बरोबर आपल्या राज्याभिषेक प्रसंगी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी हेन्री ओक्सिडेंन ह्याचा धुर्तपणा महाराजांनी हाणून पाडला. त्याच्या मागणीतील एक कलम महाराजांनी साफ नाकारले ते असे -"आमची ही नाणी आपल्या राज्यात चालवावी ". यावरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी समजून येते. माझे संग्रहातील शिवराई चलनाचा खजिना आपल्यासमोर आजच्या शिवराज्याभिषेक दिनी रिता करीत आहे. महाराजांचे आचार व विचार आपल्या मनात साठवून नव्या पिढीला जागृत करण्यासाठी संग्रहाच्या रूपाने हा छोटासा प्रयत्न बेवनाळे सौदागर यांनी केला आहे. सोबतचे छायाचित्र क्र. १ व २ ही नाणी रायगडावर शिवाजीराजांनी टाकसाळीत शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगी पाडलेली आहेत. ३)अर्धी शिवराई, ४) चौथे छत्रपती श्री शाहू महाराज,५) दुदांडी पेशवेकालीन ६) फसली उल्लेख १२३४ अशी नाणी आहेत. तसेच विविध प्रकारचे चिन्ह -सूर्य, चंद्र शिवपिंडी, बेलपत्र, ध्वज, असलेली ही नाणी संग्रहात पहायला मिळतात. श्रीबेवनाळे सरांकडे इसवीसन पूर्व २०० वर्षे पूर्वी पासूनची सम्राट अशोक, मौर्य,कुषाण, गुप्त, सातवाहन कालीन, क्षेत्रप, प्राचीन दक्षिण,उत्तर,पुर्वमध्यकालीन भारतीय नाणी, दिल्ली सल्तनत, मूगल कालीन, -पोटीन, शिसे, सोने, चांदी, तांबे, निकेलची दुर्मिळ नाणी असून, भारतीय नाणी, कम्यूरिटिटीव्ह नाणी, शेकडो पोष्टस्टँप,फर्स्टडे कव्हर्स, ९० संस्थांनीकांची बाॅंड, शिवकालीन शस्त्रास्त्रे, ताम्रपट, २२५ देशातील नाणी, नोटा, पुरातन वस्तू जूने अडकित्ते, पानपुडे, मुर्ती, भांडी इ .संग्रहित आहेत.
0 Comments