Latest News

6/recent/ticker-posts

उद्या औसा काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन

उद्या औसा काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन



शेख बी जी

औसा:दि.६ औसा शहरांमधील उद्या दिनांक ७ वार सोमवार रोजी औसा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारने  गॅस ,डिझेल, पेट्रोल च्या किमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहे. हे आंदोलन शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून करण्यात येणार असल्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी व शहराध्यक्ष शकील शेख यांनी सांगितले. कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही, अनेकांचे रोजगार या कालावधीमध्ये गेले आहेत.याचा परिणाम सर्वच जनतेवर पडला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली आहे. गॅस पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत या भाववाढीच्या विरोधात काँग्रेस कमिटी सर्व नियमांचे पालन करून आंदोलन करणार आहे या आंदोलनात सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी व शहराध्यक्ष शकील शेख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments