पर्यावरणाचे औचित्य साधून केंद्रीय मुख्याध्यापक बोटले यांचा सत्कार
कासार सिरसी:( फेरोज जागीरदार ) कोरोना सारख्या खडतर आजारावर मात करत पुन्हा सेवेत रुजू होऊन केंद्रांतर्गत सर्वच शिक्षकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला त्याबाबत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कासार शिरशी येथील श्री करी बसवेश्वर विद्यालयाच्या प्राचार्य सौ सविता मुरूमकर यांच्या उपस्थितीत संस्थेचे सचिव शिवदर्शन दादा चिंचण सुरे यांनी केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक एल एम बोटले यांचा सत्कार केला कासार सिरसी येथील श्री करी बसवेश्वर विद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त शाळा परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शाळा चालू होण्याचे संभाव्य संकेत विचारात घेऊन शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक मुरूमकर सहशिक्षक गोरे उपाध्यक्ष गिरीश चिंचनसुरे संचालक श्याम मुळज कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने हजर होते माणूस जन्मल्यानंतर त्याच्या पाळण्यापासून ते अंत्यविधी च्या सरणा साठी लाकूड गरजेचे आहे याचे भान ठेवून आज लागवड करण्यात आलेले वृक्ष कायम वाढवण्याच्या गरजे चे सचिव चिंचण सुरे यांनी मनोगत व्यक्त केले.

0 Comments