कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल किशोरजी जाधव यांचा सन्मान
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) भाजपा नेत्या तथा माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर उर्फ आक्का यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्का फाउंडेशनच्या वतीने कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल हॉटेल कारनिव्हल लातुर येथे अक्का फाउंडेशन तर्फे करोना काळात सामाजिक कार्यात सहभागी झाल्या बद्दल किशोर जाधव यांचं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त जी. श्रीकांतजी, लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिलजी पिंगळे, युवा नेते अरविंदभाऊ पाटील निलंगेकर आदी जण उपस्थित होते "अक्का फाउंडेशन " तर्फे उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना थोडासा आधार म्हणून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. माजी मंत्री व विद्यमान आ.संभाजीरावजी पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंदजी पाटील निलंगेकर यांचे विश्वासू सहकारी किशोरजी जाधव यांचे वडील कै.प्रकाश जाधव (बापू) यांचे कोरोनामुळे निधन झाले. या घटनेस 13 दिवसही पूर्ण झालेले नसताना ते स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करीत आहेत. त्यांच्यातील सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेचे खरोखर कौतुक वाटते. किशोर जाधव म्हणाले कै.बापु गेल्याच दुःख तर फार झालं, पण मी जे तीन दिवस ग्रामीण रुग्णालयात काढले त्यात रुग्णांची व नातेवाईक यांची हाल मनस्थितीत पाहुन मन पूर्ण हेलावून गेलं, अरविंद भाऊंना या गोष्टी सांगितल्या त्यांनी जबाबदारी दिली पण नियतीला वेगळंच घडवायचं होत. किशोर जाधव यांना असह्य वेदना असताना सुद्धा ते दुःख बाजूला ठेहून समाजकार्य करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

0 Comments