निलंगा येथील ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये online योगा डे साजरा
निलंगा:( प्रतिनिधी/इरफान शेख) येथील गेल्या पंधरा वर्षा पासुन लहान चिमुकल्याना घडवण्याचे कार्य करीत असलेली ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल मद्ये ऑनलाइन योगा डे साजरा करण्यात आला करोनाच्या संकटामुळे संपुर्ण राज्याती शाळा गेल्या १६ महीण्यापासुन बंद आहेत त्यामुळे विद्यार्थी चे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थी शैक्षणिक वातावरणातच असावे हे हेतु लक्षात घेत ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल चे संचालक मल्लिकार्जुन कोळळे सर व शिक्षक वृंद यांनी आॕनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आसुन त्याला पालक व विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे . एक उपक्रमशिल प्रि स्कुल म्हणुन ज्ञानदीप बालविहार चे ओळख असुन वर्षभरात जवळपास ३५ उपक्रम च्या माद्यमातुन चिमुकल्यांना घडविण्याचे कार्य करीत असतात आज योगा दिन साजरा करण्यात आला आॕनलाईन योगा मद्ये अनेक पालक विद्यार्थी सहभागी झाले होते तर सुरेखा जाजु मॕडम व संगीता विभुते मॕडम यांनी चिमुकल्याना योगा चे महत्त्व व योगा शिकवले त्याला पालक व विद्यार्थी चा चांगला प्रतिसाद मिळाला.

0 Comments