Latest News

6/recent/ticker-posts

निटूर मंडळात मुसळधार पाऊस;एका तासात 62 मि. मी. पावसाची नोंद,पिके गेले वाहून,खरीप हंगाम धोक्यात

निटूर मंडळात मुसळधार पाऊस;एका तासात 62 मि. मी. पावसाची नोंद,पिके गेले वाहून,खरीप हंगाम धोक्यात


के वाय पटवेकर

निलंगा: तालूक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद निटूर मंडळात झाली असून एका तासा मध्ये तब्बल 62 मि. मी. पाऊस पडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सलग दोन दिवसापासून निटूर व परीसरातील गावांना पाऊस झोडपत असल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे त्यामुळे निटूर मंडळात ढगफूटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत. निटूर सह परीसरात काल रविवारी सायं च्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली सलग तासभर पाऊस पडल्याने अनेकांची शेती पाण्याखाली गेली तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यामुळे खरडून गेले. पावसाचा वेग इतका मोठा होता की तासभरामध्येच सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते व ओढे नाले तुडूंब भरून वाहत होते. निटूर परीसरामध्ये दोन दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे शनिवारी सायं एकतास पाऊस पडला ज्याची पर्जन्यमापकावर चाळीस मि. मी. इतकी नोंद झाली तर दुस-याच दिवसी रविवारी सायं सुरू झालेला पाऊस एक तास पडल्याने त्याची नोंद 62 मि. मी. झाली त्यामुळे सलग दोन दिवस पाऊस होण्याने व रविवारी ढगफूटी होण्याने शेतकरी धास्तावला आहे. निटूर परीसरामध्ये मृग व आर्द्रा नक्षत्र मोजकाच पाऊस झाला माञ पेरणी योग्य झाला नाही माञ पुष्य नक्षत्रात सुरूवातीलाच पेरणी योग्य पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्याने पेरणी केली माञ गोगलगायींनी उगवलेले सोयाबीन फस्त केल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी केल्यानंतर सलग दोन दिवस ढगफूटी सारखा पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामच धोक्यात आला आहे उगवलेले बियाणे पाण्यासोबत वाहत गेल्याने शेतक-यापुढे मोठे संकट उभा ठाकले आहे.

Post a Comment

0 Comments