Latest News

6/recent/ticker-posts

परिवर्तन महिला मंडळ हाडोळी यांच्या वतीने निराधार योजनेचे पात्र लाभार्थ्यांना पासबुक वाटप

परिवर्तन महिला मंडळ हाडोळी यांच्या वतीने निराधार योजनेचे पात्र लाभार्थ्यांना पासबुक वाटप


कासार सिरसी:(प्रतिनिधी/फिरोज जागीरदार) मौजे हाडोळी ता.निलंगा संजय गांधी निराधार योजनेचे पाठपुरावा करत सौं.समाधानताई माने यांनी 22 पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न  लाभ मिळवून दिला. म्हणुन त्यांचाच हस्ते आज औपचारिकता म्हणुन पात्र लाभार्थ्यांना बॅंक पासबुक वाटप करण्यात आले, आशा वर्करचा कोरोनायोध्दा म्हणुन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाने जिजाऊ ब्रिगेड शाखा हाडोळी येथे स्थापन करण्यात करण्यात आली. यावेळी दिपालीताई सोळुंके यांची कासार शिरसीसर्कलप्रमुख म्हणुन तर वैष्णवीताई शिंदे यांची ग्रामप्रमुख म्हणुन नियुक्ती करन्यात या कार्यक्रमाला  जिजाऊ ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सौं.बोराडेताई जिजाऊ ब्रिगेड सचिव सौ.समाधानताई माने, उपाध्यक्षसौ. मीराताई देशमुख, जिजाऊ ब्रिगेड कोषाध्यक्ष सौं.बबीता ताई सोळंके, सौ सुरेखाताई कानेकर परिवर्तन महिला मंडळ अध्यक्षा शिवमति राजाबाई शिंदे,जेष्ठ समाजसेवक विठ्ठलआण्णा शिंदे, पोलीस पाटील परमेश्वर चोपणे परिवर्तन महिला मंडळ हाडोळी सर्व पदाधिकारी व हाडोळी बचत गटाची सीआरपी सौ.दीपाली ताई सोळंके सौ.लक्ष्मीबाई खंडू खोत गावातील बचत गटाच्या सर्व महिला व पात्र लाभार्थी व महीला ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बबीता ताई सोळंके यांनी केले तर प्रास्ताविक समाधान ताई माने यांनी केले तर आभार पोलीस पाटील परमेश्वर चोपणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments