Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस;नदी-नाले ओसंडून वाहू लागले

निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस;नदी-नाले ओसंडून वाहू लागले


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज रविवारी दि.18 रोजी निलंगा तालुक्यात 50 मिलिमीटर पाऊस झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुसळधार पावसामुळे तेरणा नदी ओसंडून वाहात आहे.लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वीस गावांमध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे.या अंदाजे वीस गावांमध्ये सखल भागात पाणीच पाणी जमा झाल्याचे  दृश्य आहे. जवळपास वीस गावांमध्ये असाच पाऊस झाला. शेत शिवारात पाणी पाणी तसेच सर्वत्र तळ्याचे स्वरूप आले आहे.मुसळधार पावसामुळे तेरणा नदी सुद्धा ओसंडून वाहू लागली आहे.निलंगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.सखल भागांमध्ये पाणी जमा झाले. पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस असल्याचे बोलले जात आहे. कारण पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही नदी नाले व शेतात पाणी दिसत नव्हते. या पावसाने मात्र सर्व तालुक्यात पाणीच पाणी केल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. औराद शहाजनी गाव जलमय बनल्याचे चित्र असून रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. तालुक्‍यात इतरही काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे.

Post a Comment

0 Comments