Latest News

6/recent/ticker-posts

मदनसुरी येथील आदर्श शिक्षक माजी सभापती शिवाजी चेंडकापुरे यांचे निधन

मदनसुरी येथील आदर्श शिक्षक माजी सभापती  शिवाजी चेंडकापुरे यांचे निधन


मदनसुरी: निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील मदनानंद माध्यमिक विद्यालयातील आदर्श शिक्षक निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव चेंडकापुरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मदनसुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पंचायत समिती सभापती म्हणून कार्य उल्लेखनीय होते. गणिती विषयाचे गाढे अभ्यासकही होते. परिसरातील अनेक विदयार्थ्यांना  त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभल्यामुळे विविध क्षेत्रांत अनेक विद्यार्थ्यांनी प्रगती पथावर वाटचाल करत आहेत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments