अपंग मुलीच्या डोळ्यातून बाहेर पडत आहेत खडे व तांदुळाचे दाणे
निलंगा:(प्रतिनिधी/इरफान शेख) एका दिव्यांग मुलीच्या डोळ्यातून खडे व तांदूळाचे दाणे बाहेर पडत असल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. निलंगा तालुक्यातील नदीवाडी येथील रहिवासी असलेले रामेश्वरी दत्ता बैनगीरे हिचे वडील दोन्ही पायाने दिव्यांग असून मुलगी पण दिव्यांग आहे माञ गेल्या पंधरा ते विस दिवसापासून या १४ वर्षीय मुलीच्या डोळ्यातून अक्षरशः खडे व तांदूळ बाहेर पडत आहेत. सदरील मुलीला विशेष म्हणजे काहीच ञास होत नाही परंतु डोळ्यातून सतत पाणी येत आहे. लातूर येथील डॉक्टरांना या मुलीच्या वडीलांनी तपासणीसाठी घेऊन गेले असता हा अजब प्रकार असल्याचे त्यानी सांगितले आहे. याला चमत्कार म्हणावे का अंधश्रध्दा हा मोठा प्रश्न बघणा-या लोकांना पडला आहे. परंतु या अपंग मुलीच्या डोळ्यातून मातीचे खडे व तांदळाचे दाणे बाहेर पडत असल्याने संशोधनाचा विषय झाला आहे. डॉक्टर लोकांनाही याचे निदान लागत नसल्याने सदरील मुलीचे आई वडील परेशान आहेत. नेमका हा प्रकार काय आहे कोणालाही समजायला तयार नाही. अनेक खाजगी औषधी वापरून पाहिले परंतू दररोज सकाळी सदरील मुलगी झोपेतून उठताक्षणी तीच्या डोळ्यातून मातीचे खडे व तांदूळ बाहेर पडतात. याला काय म्हणावे असा प्रश्न या भागातील लोकांना पडला आहे. जगात अनेक आश्चर्याच्या गोष्टी घडतात परंतु हा प्रकार थोडा वेगळाच असल्याने चिंतेचा विषय झाला आहे. काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही अफवा आहे म्हणतात या प्रकाराची पाहणी करण्यासाठी अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे काही कार्यकर्ते भेटी देणार आहेत. कुठल्याही बाह्य शक्तीच्या स्पर्शाशिवाय अशा पद्धतीच्या डोळ्यातून खडे तांदूळ निघणे अशक्य आहे असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले आहे.
0 Comments