Latest News

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- प्रा.अण्णासाहेब मिरगाळे

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- प्रा.अण्णासाहेब मिरगाळे 

  


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील निटुर,औराद परिमंडळातील  डांगेवडी,कलाडी,बसपुर,माचरटवाडी ई. अनेक गावला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी तहसीलदार व तालुका कृषीअधिकारी यांच्याकडे केली आहे. औराद, निटुर परिमंडळातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर,उडीद इत्यादी पिके अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे सोयाबीन,तुर उडीद ई. अनेक पिकांचे नुकसान झालेच आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचे शेतातील माती तीन ते चार फूट वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी हताश व निराश झाला आहे. तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर प्रताप भगवत सुडे, सोपान लोहरे, बालाजी सोनटक्के, चंद्रकांत डांगे, रामभाऊ सोनटक्के, रमेश सोनटक्के, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे आदी जणांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments