Latest News

6/recent/ticker-posts

वैयक्तिक घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

वैयक्तिक घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


लातूर:(जिमाका) दि.20 - यंशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत लातूर जिल्हयात सन 2021-22 मध्ये (1) नविन वसाहत योजना, (2) वैयक्तिक घरकुल योजना व (3) धनगर समाजासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक घरकुल योजना सुरु करण्यात आलेली आहे. या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयातील अटी व शर्तींची पूर्तता करुन इच्छुक लाभार्थ्यांनी नविन वसाहत योजना, वैयक्तिक घरकुल योजना व धनगर समाजासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक घरकुल योजनेचे प्रस्ताव आपल्या तालुक्यातील गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे मार्फत दिनांक 5 ऑगस्ट 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर यांचे कार्यालयात सादर करावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एस.एन. चिकुर्ते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments