रोजंदारी व वन मजुराच्या विविध मागण्याचे तहसीलदारांना निवेदन
निलंगा: कासार सिरसी येथील रोजंदारी वन मजुर म्हणुन 1990 ते आता परियंत वन मंजुर म्हणुन कासार सिरसी येथील रोप वाटीकेत काम करत असुन मागील तीन ते चार महिन्याचे रोजंदारी वन मजुराची मजुरी पगार देण्यात आली नाही कारोना परिस्थती मध्ये आशा संकट काळा मध्ये मजुराची उपास मारीची वेळ या कोराना काळात आमच्यावर आली असून आमची पगार काढण्यात यावी व आमचे काम चालु ठेवण्यात यावे व कामाची मजुरी वेळेत देण्यात यावी आम्ही इ.स. 1990 ते आता पर्यंत कोट्यावधी रोपे तयार करण्याचे काम अविरतपणे करत वृक्ष संर्धनाचे काम करत आलोय म्हणुन प्रशासनाने आमच्या कामाची दखल घेवुन आमच्या आडचणी सोडवण्यात याव्या व बोगस मजुर लावून काम करणा – या वन अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी व पुढील काम चालु ठेवण्यात यावे. मागण्या तात्काळ पुर्ण करण्यात याव्या अन्यथा आपल्या कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल. असा इशारा निवेदनावर देण्यात आला आहे या निवेदनावर चिंगुबाई गावडे,रुक्मिण ईश्वरे, संगीता ईश्वरे, रुक्मिणी भोसले, गवरा बाई ईश्वरे, सेशकला मंडले, मारुती गावडे, अविनाश ईश्वरे, सामाजिक कार्यकर्ते फिरोज जागीरदार यांनी निवेदन देण्यात आले.

0 Comments