साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 101 वृक्ष लागवड करून साजरी
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त कै. हरीभाऊ कांबळे युवा मंच यांच्या वतीने 101 वृक्ष लागवड करून जयंती साजरी करण्यात आली. निलंगा शहरातील म्हाडा काॅलनी व मातंग समाज स्मशान भुमी मध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 101 वृक्ष लागवड करण्यात आली. म्हाडा काॅलनी मध्ये निलंगा नगरीचे उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, नगरसेवक शरद पेठकर, नगरसेवक भगवान आण्णा कांबळे व सामाजिक कार्यकर्ते कर्मचारी प्रेमनाथ गायकवाड, उमेश गायकवाड यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. तसेच मातंग समाज स्मशान भूमी मध्ये कै. हरीभाऊ कांबळे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी लिंब, चिंच, आवळा, साग, तुळस, बेल इत्यादी अनेक जातीच्या वृक्षाची लागवड करून आण्णाभाऊना मानवंदना दिली. तसेच मातंग समाज स्मशान भूमीचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प केला. या प्रसंगी युवा मंचाचे ऊमेश गायकवाड, प्रदीप थोरात, शुभम हरिभाऊ कांबळे, बबलू गायकवाड, रामेश्वर कांबळे, बाळु कांबळे, अर्जुन कांबळे, करण कांबळे, दत्ता कांबळे, राम कांबळे, गणेश गवारे, मोहन कसबे, योगेश गवारे, अमोल कांबळे, विशाल कांबळे, अक्षय कांबळे, बबा कांबळे,अविनाश कलवले, अभय कांबळे, अलेश कांबळे, शिवाजी सूर्यवंशी, लिंबराज कांबळे, बाळू पेठकर, सटवाजी गायकवाड आदी जण उपस्थित होते.

0 Comments