शिरोळ येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व आरोग्य शिबीर उत्साहात
शिरोळ:{ प्रतिनिधी सलीम भाई पठाण } येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती अनोख्या पध्दतीने साजरी करण्यात आली. सकाळी आण्णाभाऊ साठे चौकात सर्वधर्मीय बांधव उपस्थित राहुन आण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन आणी झेंडा फडकावुन जयंती साजरी करण्यात आली तसेच लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर गावातील छत्रपती शिवाजी चौकात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात तसेच शेर-ए-हिंद टिपु सुलतान चौकात पण पुजन करण्यात आले. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा यांच्या वतीने आणी डॉ.अरविंद भातांब्रे यांच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद या शिबिरास लाभला अशा प्रकारे एक अभिनव उपक्रम शिरोळ ग्रामस्थ आणी आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे राबवण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते तसेच उपसरपंच प्रताप पाटील, प्रसाद जाधव, दीपक पुंडे, सिध्देश्वर कांबळे, सौदागर लामतूरे, झटींग जाधव यांचं योगदान मोलाचे ठरले.
0 Comments