औशात भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन
शेख बी जी
औसा: येथे सोमवार दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्षपदी मोतीराम कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. लातूर जिल्हा उपाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी भारतीय बौद्ध महासभेची दहा उद्दिष्ट कोणती आहेत ते सविस्तर सांगितले. तत्पूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न जी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे भारतीय बौद्ध महासभा ही संघटना चालत असून देशभरामध्ये भारत बौद्धमय कसा होईल याविषयी माहिती दिली. या संघटनेचे पुढील दहा उद्दिष्ट सांगण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय आणि उद्दिष्ट अर्थात भारत बौद्धमय बनवण्याची ब्लूप्रिंट याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे बुद्ध वंदना करीता या बौद्ध विहारांची निर्मिती करणे. धार्मिक आणि वैज्ञानिक विषयांचे अध्ययन करणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना करणे. रुग्णालय,अनाथालय,सहाय्यता केंद्राची उभारणी करणे. सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणे. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र अथवा बौद्ध शाळा निर्माण करणे. सर्वसामान्य लोकांपर्यंत बौद्ध धम्माची खरी माहिती देणारे बौद्ध साहित्य पत्रक प्रकाशित करणे. गरज भासल्यास बौद्ध धम्म उपदेशकांची निर्मिती करणे.भारतातील बौद्ध धम्मीयांचे सभा-संमेलने यांच्या सर्वसमावेशक कार्य व बंधुता स्थापित करण्याकरिता कार्य करणे. अशी उद्दिष्टे सांगण्यात आली आणि यावेळी औसा तालुक्याची शाखा स्थापन करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्षपदी मोतीराम शाहू कांबळे, उपाध्यक्ष मारुती बंकट वाघमारे, उपाध्यक्ष किसन मारुती भांगे, उपाध्यक्ष धनराज विठ्ठल मोरे,मुख्य सचिव हरिश्चंद्र बौद्धाजी मांजरे, सचिव युवराज नागनाथ गायकवाड, सचिव विक्रम कांबळे, कोषाध्यक्ष बाबासाहेब मनोहर कांबळे, संघटक मारुती सिद्धाराम वाघमारे, संपर्कप्रमुख सचिन वसंत कांबळे यांची नियुक्ती लातूर जिल्हा उपाध्यक्ष महादेव वाघमारे आणि लातूर जिल्हा संपर्कप्रमुख/प्रसिद्धी प्रमुख बालाजी उबाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

0 Comments