Latest News

6/recent/ticker-posts

एसबीआय आरसेटी देणार उद्योगाचे धडे- सतिश डी कांबळे

एसबीआय आरसेटी देणार उद्योगाचे धडे- सतिश डी कांबळे


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.16 ऑगस्ट 2021 रोजी मौजे हासुरी बु. ता. निलंगा येथे जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बिराजदार सरपंच, चंदू माधव पाटील तंटामुक्त अध्यक्ष हे उपस्थित होते. यावेळी सतिश डी कांबळे भारतीय स्टेट ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे(संकाय) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी संयसायत्ता समुहाना प्रशिक्षण संस्थेतर्फे कोण-कोणते प्रशिक्षण दिले जाते या विषयी माहिती देऊन एसबीआय आरसेटी लातुर हि संस्था 18 ते 45 वयोगटातील ग्रामीण भागातील सुसक्षित बेरोजगार युवकांना, युवती व स्वंयसायत्ता समूहांना उदयोग व्यवसायाचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून धडे देणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली संस्था आहे. या संस्थेने लातुर जिल्ह्यातील सुसक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मार्केटिंग मार्केट सर्वेक्षण प्रकल्प अहवाल व यशस्वी उद्योजकतेच्या अंगी असणाऱ्या सक्ष्मता या विषयावर मार्गदर्शन करून उद्योजक घडवून बेरोजगार युवकांना नोकर न बनता हाताला काम मिळाले तर बेकारी दुर होऊन मालक कसे बनायचे हे सांगुन लातुर जिल्हा सुसक्षित बेरोजगार मुक्त करण्यासाठी एसबीआय आरसेटी प्रयत्नशिल आहे. उपस्थितांना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकुमार बोडके यांनी केले व आभार सुचिता पांचाळ यांनी मानले यावेळी संयसायत्ता समुहातील महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments