Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अभ्यासिकाचे काम पूर्णत्वाकडे

भादा येथील स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अभ्यासिकाचे काम पूर्णत्वाकडे 



बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे अभ्यासिका उभारण्यात येत आहे.या अभ्यासिकेचे काम पूर्णत्वाकडे आले असून काही दिवसातच या अभ्यासिका सुरू होणार असल्याचे समजते. औसा तालुक्यातील भादा येथे मोठ्या प्रमाणात युवक वर्ग स्पर्धा परीक्षा देत आहेत. याकरिता ग्रामीण भागांमध्ये त्यांना घरामध्ये बसण्यासाठी किंवा अभ्यासासाठी पुस्तके मिळत नाहीत आर्थिक परिस्थिती खराब असल्याने ते घेऊ शकत नाहीत परंतु शासनाकडून जो ग्रामपंचायत साठी निधी येतो त्याचा सदुपयोग म्हणून 15 वा वित्त आयोगातून स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आणि अभ्यासिका सुसज्ज तयार करण्यासाठी ग्रामपंचायतचा निधी वापरून हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. अभ्यासिका तयार करण्यासाठी उपसरपंच बी एम शिंदे,ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील,सुर्यकांत उबाळे,ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी,नुकतेच एम पी एस सी उत्तीर्ण होऊन पी एस आय पदी निवड झालेले दिलीप गवळी,गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण प्रेमी नागरीकांचे सहकार्ये यांनी सतत या अभ्यासिकेचा पाठपुरावा केल्याने आज ही अभ्यासिकाचे पूर्णत्वाकडे येत आहे. सध्या या ठिकाणी ग्रामसचिवालय अशी इमारत असून त्यामध्ये ग्रामपंचायतीने एकूण 52 विद्यार्थ्यासाठी बसण्याची सुसज्ज अशी व्यवस्था केली आहे. यामुळे या ठिकाणी भादा येथून नक्कीच अधिकारी घडतील असे दिसून येत आहे. या वेळी आज शनिवार दिनांक 14 ऑगस्ट 2021रोजी ग्रामपंचायतचे उपसरपंच शिंदे आधार प्रतिष्ठानचे आधारस्तंभ आर आर पाटील मानवाधिकारचे जिल्हाध्यक्ष विनोद सावंत व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments