अशोकराव पाटील निलंगेकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी फेरनिवड
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा विधानसभा मतदारसंघाचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी फेरनिवड झाल्याबद्दल आज अशोक बंगला निलंगा येथे मसलगा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुल व्यवस्थापक व्यंकटराव शिंदे साहेब, संगायो समितीचे सदस्य सुरेंद्र धुमाळ, औराद बाजार समिती चे संचालक गंगाधर चव्हाण, रमेश मोगरगे, धनराज कोळेकर, नेताजी पाटील, मसलगा गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, माजी उपसरपंच गणीसाहेब शेख, पत्रकार रविकिरण सूर्यवंशी, महम्मद सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती.


0 Comments