मदनसुरी,कोकळगाव परिसरात श्रावण सरींची संततधार
मदनसुरी:( प्रतिनिधी द्रोणाचार्य कोळी ) रविवार मध्यरात्रीपासून निलंगा तालुक्यातील सर्वदूर गावामध्ये श्रावण सरीची संततधार असून, पशुधारकाना पशु चारण्यासाठी समस्या निर्माण होत असून, उडीद, मूग काढणीस व्यत्यय निर्माण झालेला आहे. नदीकाठी असलेल्या सोयाबीन पिकांची मात्र आशा संपलेली आहे, सर्वदूर पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरणही जाणवत आहे. परिसरातील हातचे आलेले कोंथिबीर मात्र गेले आहे. परिसरात कुठे मुसळधार तर कुठे संततधार रिमझिम पाऊस सतत चालू असल्याने, गावातील 70 टक्के स्लॅपचे घरे गळत आहेत. श्रावण सरींनी वसुंधरा हिरव्या शालू पांघरून सजली आहे. जिकडे तिकडे चोहीकडे हिरव्यागार शेतांनी शिवार थाटले आहेत. पक्ष्याच्या मंजूळ स्वरांनी श्रावण सरीची मधुर बासरी बरसतच आहे.

0 Comments