Latest News

6/recent/ticker-posts

औसा पालिकेने घेतलेला ठराव तीन दिवसात रद्द निधी वळवला इतरत्र;पालिकेचा अजब कारभार

औसा पालिकेने घेतलेला ठराव तीन दिवसात रद्द निधी वळवला इतरत्र;पालिकेचा अजब कारभार



शेख बी जी

लातूर: जिल्ह्यातील औसा नगरपालिका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. यावेळेला तर एका नवीन गोष्टीमुळे चर्चेत आहे उर्दू घर बांधण्याचा ठराव २० ऑगस्ट रोजी घेतला व हा घेतलेला ठराव २३ तारखेला रद्द केला व या कामासाठी आलेला निधी इतरत्र वळवला. या अशा अजब निर्णयामुळे पालिका सध्या चर्चेत आहे. उर्दू घर हे आम्ही केलेल्या कार्याचे फलित आहे असे अनेक जण म्हणत असल्यामुळे नगराध्यक्ष अफसर शेख यांनी श्रेय कोणीही लाटु नये यासाठी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चा शहरात आहे. अफसर शेख यांनी स्वतः सोशल मीडियावर जे श्रेय लाटत आहेत त्यांनी पुन्हा हे उर्दू घर संबंधित मंत्र्यांकडून मान्य करून करावे असे अवाहन केले आहे. दोन्ही पक्षाच्या वादात मुस्लिम समाजाच्या आत्मीयतेचा असलेला हा मुद्दा मागे पडला आहे. येणार्‍या पाच महिन्यात काँग्रेस पक्षाने उर्दू घरासाठी निधी आणावा असे अहवान केले आहे. यासंबंधी सत्तार खडकाळे यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" च्या उपसंपादकशी बोलताना सांगितले की "जो कोणी हे काम करेल त्याला मुस्लिम समाज डोक्यावर घेऊन नाचेल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये संबंधित पक्षाच्या सोबत राहतील." घेतलेला ठराव तीनच दिवसात रद्द ठरवल्यामुळे पालिकेचा अजब कारभार जनतेला पाहायला मिळत आहे. श्रेय कोणीही घ्या पण आम्हाला उर्दू घर बांधून द्या अशा प्रकारचे मागणी स्थानिक मुस्लिम समाजाकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments