अमेस्टो संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी मुजीब पटेल जागीरदार यांची निवड
अहमदपुर: येथील माजी उपनगरध्यक्ष तथा संस्था चालक मुजीब पटेल जागीरदार यांची ऑल महाराष्ट्र मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटीज अँड टीचर्स ऑर्गनाइजेशन(अमेस्टो) या संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. औरंगाबाद येथे 16 ऑगस्ट रोजी संघटनेची विषेस सभा आयोजन करण्यात आली होती या सभेत संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष ए.एम.देशमुख यांनी मुजीब पटेल जागीरदार यांची उपाध्यक्ष पदी एकमतानी निवड केली. या निवडी बदल अहमदपुर चाकूर विधानसभा चे आमदार बाबासाहेब पाटील, औसाचे नगरध्यक्ष अफसर शेख, लायक पटेल, फारूख देशमुख, रज्जाक बापू देशमुख, नजीब जागीरदार आदीने अभिनंदन केले.

0 Comments