शिरोळ परिसरातील जमिनीच्या दिशेने वाकलेले विद्युत पोलची दुरुस्ती करावी- रमेश लांबोटे
शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा ते दत्ता पाटील या परिसरातील अगदी रस्त्याच्या लगत असलेल्या मुख्य विद्युत वाहिनी ताराचे विद्युत पोल हे जमिनीच्या दिशेने वाकले आहे जमीन ते विद्युत अंतर 10 ते 12 फूट एवढ्या अंतरावर ते खाली वाकल्याने विद्युत पोल खाली पडून दुर्घटना होईल हे नाकारता येत नाही असे सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटी यांनी सांगितले आहे तरी विद्युत महावितरण कंपनी व निलंगा विद्युत महावितरण कार्यालयाने या परिसरातील जमिनीच्या दिशेने अनेक विद्युत पोल ची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करून त्या विद्युत प्रवाह आला व विद्युत पोल पोल सरळ करून शेतकरी वर्गाची व रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची भविष्यात होणारी दुर्घटना टाळावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीचे लातूर जिल्हा अध्यक्ष रमेश लांबोटी यांनी प्रशासनाला मागणी केली आहे.
0 Comments