महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने निटुर(मोड) येथे चिखलावरून वाहनधारकांची घसरण
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातून होत असलेल्या लातूर ते जहीराबाद महामार्गाची कामे अंतिम टप्प्यात आले असून जवळजवळ सर्वच काम पूर्ण झाले आहे मात्र येथे अद्याप काही अंतराचे काम शिल्लक आहे मागील दोन दिवसाने पाऊस पडत असल्याने काही भाग हा चिखलमय झाला आहे. निटुर(मोड) येथे पोलीस चौकीच्या परिसरात चिखल झाला आहे त्यामुळे वाहनधारक वाहन चालवताना त्यांची घसरण होत आहे व नागरिकांना या चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे अनेक वाहनधारक आज मंगळवारी या चिखलावरून घसरण होताना पाहावयास मिळाले लवकरात-लवकर शिल्लक टप्पा पूर्ण करावा व होत असलेली नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय टाळावी अशी मागणी निटुर(मोड) येथील सामाजिक कार्यकर्ते लतीफ चाऊस, इमाम सरदार व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Comments