Latest News

6/recent/ticker-posts

भादेकर भूमीपुत्र विकास लटूरे यांचा कृषी मंत्री यांच्या हस्ते सत्कार

भादेकर भूमीपुत्र विकास लटूरे यांचा कृषी मंत्री यांच्या हस्ते सत्कार


बी डी उबाळे

औसा: भादेकर भूमिपुत्र विकास लटुरे यांचा कृषी विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावली म्हणून सोमवार दि 16 ऑगष्ट 2021 रोजी त्यांचा सत्कार राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लातूर येथे विविध अधिकारी, नेते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. आज राज्यस्तरीय सोयाबीन परिषद २०२१ चे आयोजन कृषी महाविद्यालय लातूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये आपले मित्र विकास लटूरे यांना कृषि विभागात उल्लेखनीय व सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दादाजी भूसे, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य, एकनाथ डवले, प्रधान कृषी सचिव, महाराष्ट्र राज्य, धिरज कुमार, आयुक्त कृषि, अशोक ढवण, कुलगुरू, व.ना.म.कृ.वि.परभणी, मा खा ओमराजे निंबाळकर आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. या सन्मानाबद्दल भादेकर भूमिपुत्र विकास लटुरे यांचा औसा तालुक्यात आणि मित्र मंडळ, नातेवाईक, परिवारातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments