निलंगा तालुक्यातील गुणवंताचा सत्कार समारंभ संपन्न
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेतील निलंगा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी तालुक्यातील 58 विद्यालयाचे मुख्याध्यापक, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्याने उपस्थित होते. यावेळी 174 गुणवंत विद्यार्थ्यां सोबत मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके होते तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव बब्रुवान सरतापे हे होते. प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड हे उपस्थित होते. प्रा. प्रशांत गायकवाड यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी गुणवत्तापुर्ण शिक्षण घेऊन पुढे चांगल्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात याबाबत माहिती दिली. संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. डॉ. भागवत पौळ यांनी पुढील अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठले पाहिजे असे मत व्यक्त केले. संस्थेचे समन्वयक दिलीप धुमाळ यांनी विद्यार्थ्यांनी पुढील उपयुक्त शिक्षणाच्या संधी ओळखून शिक्षण घ्यावे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याबाबतचे अवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुर्यकांत वाघमारे, प्रा. दत्ता गोसलवाड, प्रा. अभिजीत गोसावी, प्रा. प्रदिप घोडके, प्रा. श्रीराम पौळकर, प्रा. धनराज मंडले, प्रा. राकेश दवणे, प्रा. अमोल पाटील, प्रा. अनुप पांचाळ, गोपाळ भोपी आदीनी मेहनत घेतली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. श्रीकृष्ण दिवे व प्रा. विश्वनाथ जाधव यांनी केले तर आभार प्रा. सुर्यकांत वाघमारे यांनी मानले.


0 Comments