Latest News

6/recent/ticker-posts

निटुर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार

निटुर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार


निटूर:( प्रतिनिधी ) येथील महाराष्ट्र विद्यालयातून 97.80% गुण घेऊन संतोष गिरिधरसिंग हजारे प्रथम, शेख महंमद बिलाल 97.60% गुण घेऊन द्वितीय, तर अनुक्रमे सोमवंशी प्रणिता, घोडके योगिता धनाजी, व बुरकुले निकिता या 97.20%.गुण घेऊन तृतीय येण्याचा मान मिळवला यांचा सत्कार वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके होते तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव बब्रुवान सरतापे हे होते. प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी पालक नंदकुमार सोमवंशी, श्रीमती घोडके, श्रीमती शेख, व बाबुराव बुरकुले आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments