औसा तालुका भारतीय बौद्ध महासभा शाखा स्थापन
बी डी उबाळे
औसा: तालुका भारतीय बौद्ध महासभा शाखा स्थापन लातूर जिल्हाध्यक्ष कुमारभाऊ सोनकांबळे यांनी केली कार्यकारिणी जाहीर संस्थापक अध्यक्ष:- बोधीसत्व परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय माननीय आयु राजरत्नजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका नुतन कार्य कारणी निवड बैठक संपन्न दि. 19 ऑगस्ट 2021 गुरुवार रोजी दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका शाखा नुतन कार्यकारणी निवड बैठक घेण्यात आली. या बैठकीस आयु. प्रा. किशोर चक्रे मराठवाडा महासचिव भा. बौ. महासभा आयु. कुमार सोनकांबळे जिल्हा अध्यक्ष भा. बौ. महासभा जिल्हा लातूर आयु. महादेव वाघमारे उपाध्यक्ष जिल्हा शाखा लातूर आयु. रविकांत सिरसाट मुख्य सचिव जिल्हा शाखा लातूर आयु विजय मस्के सचिव जिल्हा शाखा लातूर आयु सुरेंद कांबळे संस्कार प्रमुख जिल्हा शाखा लातूर आयु. बालाजी उबाळे प्रसिद्धी प्रमुख जिल्हा शाखा लातूर आयु. अरविंद दामावले मुख्य संघटक जिल्हा शाखा लातूर उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यांनतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. प्रास्ताविक मारुती वाघमारे यांनी केले. सर्वं मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मराठवडा महासचिव प्रा किशोर चक्रे सरांनी भारतीय बौद्ध महासभेची आचार संहिता या विषयी मार्गदर्शन केले आय. रविकांत सिरसाट मुख्य सचिव जिल्हा शाखा यांनी भारतीय बौद्ध महासभेचे दहा उद्दिष्ठे अर्थात ब्लु प्रिंट या विषयी सविस्तर व मुद्देसुद मार्ग दर्शन केले आयु विजय भाऊ मस्के सचिव जिल्हा शाखा यांनी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचे धार्मिक, सामाजिक विचार या विषयी मार्गदर्शन केले. आयु राजेंद्र बनसोडे अध्यक्ष तक्षशीला बौद्ध विहार सारोळा रोड औसा यांनी धम्म विषयी सखोल मार्ग दर्शन केले. बुद्ध मुर्ती साठी भारतीय बौद्ध सभेने केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. सर्वानुमते सर्व उपस्थित तालुका सदस्यांनी तालुका अध्यक्ष पदी आयु मोतीराम कांबळे यांचे नाव सुचविले. मारुती वाघमारे यांनी अनुमोदन दिले. औसा तालुका शाखा भारतीय बौद्ध महासभा सर्व पदाधि काऱ्यांची खालील प्रमाणे निवड करण्यात आली. अध्यक्ष- आयु मोतीराम कांबळे, उपाध्यक्ष- मारुती वाघमारे, किसन भांगे, धनराज मोटे, मुख्य सचिव- हरिश्चंद्र मांजरे, सचिव -युवराज गायकवाड, विक्रम काळे, कोषाध्यक्ष- बाबासाहेब कांबळे,संघटक- मारोती सिद्राम वाघमारे, संपर्क, प्रमुख- रविंद्र उबाळे, पर्यटन प्रमुख, सचिन कांबळे वरील सर्व पदाधिकार्यांचे जिल्हा कार्य कारणीच्या वतीने मान्यता देवून स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या बैठकीचे अध्यक्ष कुमार भाऊ सोनकांबळे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा लातुर यांनी भारतीय बौद्ध महासभेचा इतिहास व संघटन कौशल्य वाढी साठी सखोल मार्गदर्शन केले. वरील तालुका कार्य कारणी जाहिर केली. सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. भारत बौद्धमय करण्याचे अवाहन केले आभार प्रदर्शन :- उपस्थित सर्व मान्यवर व सदस्य आणि पदाधि काऱ्यांचे आभार मारुती वाघमारे यांनी व्यक्त केले. बैठक यशस्वी करण्यासाठी आयु मोतीराम कांबळे औसा तालुका अध्यक्ष,आयु महादेव वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष भा बौ.महासभा,आयु बालाजी देविदास उबाळे प्रसिद्धी प्रमुख जिल्हा शाखा भा. बौ. महासभा यांनी परिश्रम घेतले.

0 Comments