उजनी शिवारातील दीडशे हेक्टरवरील सोयाबीन पिकांचा सर्व्हे
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा कंपनीचे प्रतिनिधी अखेर बांधावर
बी डी उबाळे
औसा: मध्यंतरी पावसात पडलेल्या खंडामुळे येथील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधून होणाऱ्या तक्रारी पाहता शुक्रवारी (दि २०) आणि शनिवारी (दि२१) ऑगष्ट रोजी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी बांधावर येऊन दीडशे हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे सर्वेक्षण केले आहे.औसा तालुक्यासह उजनी परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला,यानंतर पिकेही जोमात आली. परंतु, पिकांना फुले व शेंगा लागण्याच्या वेळेमध्ये औसा तालुक्यासह उजनी परिसरात पावसाचा खंड पडला होता. पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला परिणामी, शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस चांगला पिकायोग्य झाल्याने सोयाबीनसह इतर पिके चांगली आली होती पण आता पिकांना शेंगाच नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करींत आहेत.यामुळे पीकविमा खरींप पिकांची पेरणी झाली होती. संदर्भातील २९ जून २०२० च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १०.२ नुसार प्रतिकूल परिस्थितीत अपेक्षित उत्पादनात ५० टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याची तरतूद आहे. याच तरतुदीच्या आधारावर तालुक्यातील पीकविमा धारक शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१-२२ साठी २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई देण्याच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षनाआधारे शासन व प्रशासनाकडून वेळेत पाठपुरावा करून मदत मिळावी, याकरिता उजनीतील शेतकरी बांधवांमार्फत पाठपुरावा करण्यात येईल. पंचनामा करताना कृषी पर्यवेक्षक विकास डी. लटूरे, मंडळ कृषी धिकारी जे. बी राऊत, कृषी सहायक धीरजकुमार भोसले, विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी जाधव, कृषिमित्र बाळासाहेब ढवण, प्रवीण कोपरकर, केतन ढवण, अजिंक्य शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

0 Comments