संकल्प मुलांच्या वसतिगृहाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कोरोना काळात होणारी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी कधीच भरुन न निघणारी- बाबासाहेब वाघमारे
अहमदपूर:(प्रतिनिधी) अहमदपूर हे शिक्षणाची पंढरी म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. या ओळखी मध्ये शहरातील नामांकित सर्व विद्यालय व शहरातील अनेक वसतीगृह यांची महत्त्वाची भूमिका आहे. शहरातील कमला नेहरू विद्यालय हे एक असेच गुणवत्तेची परंपरा कायम टिकून ठेवणारे विद्यालय व ज्या वसतीगृहातील शेकडो मुलं डॉक्टर, इंजिनिअर, नौदल, सैन्यात, शास्त्रज्ञ झाली आहेत असे शहरातील संकल्प मुलांचे वसतीगृह. संचालक बाबासाहेब वाघमारे यांच्या संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हे वसतीगृह चालवण्यात येते, त्यांच्या वतीने मार्च २०२१ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये विद्यालयातून प्रथम आलेल्या नागेश प्रकाश केंद्रे, द्वितीय आलेला रितिक कोकरे व विकास देबगुंडे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमला नेहरू विद्यालयाचे उपमुख्याध्यापक उमाकांतजी पाचंगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकरराव जोंधळे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब वाघमारे यांनी गुणवंतांना शुभेच्छा देताना कोरोना काळात होणारी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी ही कधिच भरुन न निघणारी आहे.या दोन वर्षांत झालेल्या शैक्षणिक नुकसानीचे परिणाम हे दुरगामी आहेत.येणाऱ्या दशकात विद्यार्थ्यांना या परीणामांना सामोरे जावे लागणार आहे असे मत व्यक्त केले.या सत्कार कार्यक्रमास चंद्रकांत मिरजगावे, प्रकाशजी केंद्रे, पांडुरंग नरवटे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, प्रदिप गायकवाड, सादिक कुरेशी, संजय बने, संकल्प वाघमारे सह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित उमाकांत पाचंगे व मधुकर जोंधळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप गायकवाड यांनी तर आभार प्रकाश केंद्रे यांनी मानले.

0 Comments