Latest News

6/recent/ticker-posts

मराठा भवना सारखेच होणार औसा येथे शहिद टिपु सुलतान उर्दू घर

मराठा भवना सारखेच होणार औसा येथे शहिद टिपु सुलतान उर्दू घर



शेख बी जी

लातूर: दि.२२ जिल्ह्यातील औसा नगरपालिका सतत चर्चेत असते. मागील अनेक दिवसांपासून मराठा भवन संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत असतानाच 20 ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये औसा नगरपालिकेने शहरात हजरत शहिद टिपू सुलतान उर्दू घर बांधण्याचा निर्णय घेऊन पुन्हा चर्चेत आली आहे. या निर्णयाचे सर्व स्थरातून स्वागत केले जात आहे. सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत डॉक्टर अफसर शेख यांनी सर्वांचे सुरवातीपासूनच लक्ष दिले होते. हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा सर्वांसमोर सरस ठरले आहेत. मला केवळ अल्पसंख्यांकांचा नेता म्हणवून घ्यायला आवडणार नाही तर मी सर्व समाजाचा नेता आहे हे त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून व केलेल्या कामावरून दिसुन येते. मराठा भावना ची जशी मागणी शहरात होती,तशीच मागणी अल्पसंख्यांक नेत्यांकडून उर्दू घरांची मागणी सतत होत राहिली आहे.त्याचाच एक भाग म्हणून शहरात उर्दू घर निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला अशी चर्चा शहरात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष लक्ष औसा नगरपालिकेवर असल्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी सर्वतोपरी  शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. लातूर शहरात उर्दू घराची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. मात्र त्या ठिकाणी उर्दू घराची निर्मिती झाली नाही. त्या अगोदर औसा नगरपालिकेने हा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षा पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सरस असल्याचे सोशल माध्यमांवर चर्चिले जात आहे.

Post a Comment

0 Comments